ग्रामपंचायत पाम

पाम हे पालघर तालुका व पालघर जिल्हा येथील निसर्गसंपन्न व रमणीय गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पाम गावात एकूण 1,246 घरे असून गावाची एकूण लोकसंख्या 4,150 आहे. त्यापैकी 2,547 पुरुष आणि 1,603 महिला आहेत. तसेच 0 ते 6 वर्षे वयोगटातील 515 बालकांची नोंद आहे, त्यापैकी 262 मुलगे व 253 मुली आहेत. गावात अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या 342 असून अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या 126 आहे.गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असून नारळ, सुपारी व भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बहुसंख्य लोक शेतकरी व शेतमजूर म्हणून कार्यरत आहेत, तर काही नागरिक शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर व्यवसायांमध्ये कार्य करतात. पाम ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत प्रमुख संस्था असून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांचे डांबरीकरण, अंगणवाडी केंद्रे, महिला बचत गट तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवते. गावातील सांस्कृतिक जीवन विविध उत्सव व परंपरांनी समृद्ध आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय गावात उपलब्ध असून संपूर्ण गावाचे कोंकरेटीकरण करण्यात आले आहे पाम गावात सात जातीचे(कुंभार , सुतार , लोहार , आगरी, वंजारी ,बौद्ध ,वाणी व इतर) लोक नांदत असून सर्व प्रेमाने व गोडी गुलाबी ने नांदत आहे . नैसर्गिक सौंदर्यामुळे पाम गाव पर्यटकांनाही आकर्षित करतो.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
4150
पुरुष लोकसंख्या
2547
महिला लोकसंख्या
1603
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
515
अनुसूचित जाती (SC %)
342
अनुसूचित जमाती (ST %)
 126

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक
सुविधा प्रकार
उपलब्ध (होय/नाही)
संख्या
रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय
होय
 
 
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)
 नाही 
 
 
उपकेंद्र (Sub Center)
 नाही 
 
 
अंगणवाडी
होय 
 
  
प्राथमिक शाळा
 होय 
 
  
माध्यमिक शाळा
 होय 
 
 
उच्च माध्यमिक शाळा
  नाही 
 
 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र
 नाही 
 
 
समुदाय भवन (Community Hall)
होय 
 
  
१०
स्वस्त दर दुकान (PDS)
होय 
 
 
११
श्मशानभूमी / स्मशानभूमी
होय 
 
   
१२
इंटरनेट / मोबाईल टॉवर
होय 
– 
 
१३
सीएससी केंद्र (CSC Center)
होय  
 
  

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत पाम 

बँकेचे नाव :  BANK OF BARODA

शाखेचे नाव: BOISAR(WEST),MUMBAI,MAHARASHTRA.

अकाउंट नंबर : 35030100031198

आई एफ एस सी कोड : BARB0BOISAR

पत्ता : ग्रामपंचायत पाम -टेंभी ,ता.पालघर जि. पालघर 401501